प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना

तुम्हाला पिक विम्याची पैसे पाहिजे असतील तर लवकर करा हे काम!

मागील आठवड्यात आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वारे सह पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारी गहू आणि भुईमूग सोयाबीन यासारख्या खूप साऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.


ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई चे पैसे त्यांना दिले जाणार आहेत. पण विम्याची पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करावे लागणार आहे. या विषयी माहिती आपण पाहणार आहोत. जर आपल्या शेतातल्या पिकाचे नुकसान झालेला असेल तर हा मजकूर शेवटपर्यंत वाचा.


      •  प्रधानमंत्री पिक विमा योजना • 📣

ही योजना नेमकी काय आहे हे आपण थोडक्यातच समजून घेऊ.

शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळावं व तसेच पिकाची नुकसान झालेले त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिके रब्बी हंगामातील पिके आणि सर्व प्रकारचे फळे पिके यासाठी विमा काढता येतो. 


       रब्बी पिक विमा 2022

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 चे विमा अर्ज भरलेले आहेत मागील महिन्यात व आठवड्यात महाराष्ट्रात वाऱ्यासह पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान पाहिजे असेल तर नुकसान भरपाई साठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे . जे जे शेतकरी नुकसान भरपाई चा अर्ज भरत्यात शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा 2022 चे पैसे सरकारकडून दिले जातील त्यामुळे पिकाचे नुकसान झालेले असेल तर हा अर्ज तुम्ही नक्कीच भरा.

नुकसान भरपाई चा अर्ज कसा भरायचा व त्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे याविषयी आपण माहिती पाहू. 

      

              पिक विमा नुकसान भरपाई चा अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्र खालील 👇👇👇

        

          १).  पिक विमा भरलेली पावती

           २).  बँकेचे पासबुक

           ३).   आधार कार्ड


        •  नुकसान भरपाई चा ऑनलाईन कसा भरावा खालील प्रमाणे 👇👇

 १    प्रथम शेतकऱ्याला आपल्या मोबाईल मध्ये Crop Insurance  हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून त्याला आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागेल. 

२ त्याच्यानंतर ते ॲप उघडायचे आहे. ते ॲप मध्ये तुम्हाला असं दिसेल पीक नुकसान माहिती कळवा असा पर्याय तुम्हाला तिथे दिसेल. त्यावरती क्लिक करायचे आहे.

३ आता तुम्हाला तिथे पिक विमा अर्ज चा पॉलिसी नंबर विचारला जाईल तो तिथे टाकायचा आहे. 

४ त्याच्यानंतर तुम्हाला थोडीफार माहिती विचारली जाईल ती भरायचे आहे. 

५ त्याच्यानंतर तुमच्या पिकाची नुकसान कशामुळे झाली आहे ते तुम्हाला नीट व्यवस्थित भरायचे आहे. 

६ त्यानंतर तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचे फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावा लागेल.

७ सर्वात शेवटी अर्ज पूर्ण भरल्यानंतर शेवटी तुम्हाला एक डोक्यात आयडी तुम्हाला मिळतो तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे.

       

       •  प्रधानमंत्री पिक विमा योजना  •

                   

            https://pmfby.gov.in/

               




Comments

Popular posts from this blog

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

पोलीस भरती 2022

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022